निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- देशभर साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत.याच कार्यक्रमांचा एक कार्यक्रम म्हणुन आज दि.१० आॅगस्ट रोजी महापुरुषांच्या वेशभुषांमधे सौ.डी.आर.चौधरी विद्यालय निंभोरा तर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या रॅलीचे स्वागत निंभोरा ग्रामपंचायत तर्फे करण्यात येऊन पुष्प वर्षाव करण्यात आला .
या प्रसंगी निंभोरा ग्रा.पंचायतचे सरपंच सचिनभाऊ महाले तसेच तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, राष्ट्रवादी रावेर तालुका अो.बी.सी सेल चे अध्यक्ष सुनिल कोंडे,माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद कोंडे,ग्रा.पंचायत सदस्य अमोल खाचणे, दिलशाद खान सर,स्वप्नील गिरडे,सतिष पाटिल,एम.के.
तायडे, तसेच ग्रा.पंचायत सदस्या सौ.संगीता राणे,सौ.रेखा कोळंबे,सौ.मंदाकिनी ब-हाटे तसेच ग्रा.विस्तार अधिकारी गणेश पाटील ,तसेच रेणुका देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे नरेंद्रशेठ ढाके,हेमंत नेमाडे ,ज्ञानदेव नेमाडे व संचालक मंडळ तसेच मान्यवर धनराज राणे सर,नितीनभाऊ पाटिल,पत्रकार दिलीप सोनवणे सर,पप्पु कोळंबे सर,युनुस खान,अनिल ब-हाटे,सागरे तायडे सर, शोएब खान,प्रदिप कोळी, डेवीन ढाके ,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक व मान्यवर ,पत्रकार बांधव ,अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रा.पंचायत कर्मचारी व सौ.डी आर.चौधरी माध्य विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका व गावातील नागरीक उपस्थित होते.
तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त सौ.डी.आर.चौधरी माध्य .विद्यालया तर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करणेत आले.यामधे रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,सामुहिक राष्ट्रगीत गायन या सर्व प्रकारच्या स्पर्धांचे शाळेतर्फे आयोजन केले गेले होते.तसेच हर घर तिरंगा या उपक्रमासाठि शाळेतर्फे दोन तिरंगा दूत चंद्रकांत देशमुख सर व नितीन दोडके सर यांची नियुक्ती करणेत आली होती.या दरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन हर घर तिरंगा विषयी माहिती दिली.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजन यशस्वी रितीने होणेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सायराबानो खान मॅडम यांच्या मार्गदर्शना नुसार हेमलता नेमाडे मॅडम,सुर्यकांत पाटिल सर ,गोकुळ भोई सर,उदय अवसरमल सर,सरफराज तडवी सर,गौरव नेमाडे सर ,तसेच मुकुंदा फालक व तुषार भंगाळे यांनी यशस्वीपणे आयोजन केले.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






