Har Ghar Tiranga: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( P.M. Narendra modi )यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga ) हा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, या हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होत घरावर झेंडा लावण्यासाठी चढलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा घरावरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जव्हार तालुक्यातील राजेवाडी गावात घडली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालघर ( Mumbai ):- संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना पालघर मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम मोठ्या दिमाखात सुरु आहे. या अमृत महोत्सवात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, या हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होत घरावर झेंडा लावण्यासाठी चढलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा घरावरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जव्हार तालुक्यातील राजेवाडी गावात घडली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त संपूर्ण देशात अमृत महोत्सव उपक्रम सुरू आहे. याच अमृत महोत्सवामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील घरोघरी तिरंगा फडकवण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, या हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जव्हार तालुक्यातील नांदगावपैकी राजेवाडी या गावात घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी घरावर चढलेल्या हा वयोवृद्ध व्यक्ती खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण भाऊ शिंदे, असे या ६५ वर्षीय मृत्यू झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
जव्हार नांदगावपैकी राजेवाडी या गावात राहणारे लक्ष्मण शिंदे शनिवारी सकाळच्या सुमारास आपल्या कौलारू घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी चढले. मात्र, यादरम्यान कवले फुटल्याने ते थेट खाली कोसळले यात त्यांना जबर दुखापत झाल्याने तात्काळ जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु दुखापत गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान लक्ष्मण शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.