शेअर मार्केटमधील बादशाह गेला! : राकेश झुनझुनवाला यांचं निधन,

Spread the love


rakesh jhunjhunwala : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झाल्याची माहिती आहे. राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासूून आजारी असल्याची माहिती आहे.

मुंबई : –  प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. बिग बुल अशी त्यांची ओळख होती. झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुगणालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं आहे.


राकेश झुनझुनवाला यांची बिग बुल अशी ओळख होती. त्यासोबत अक्सा एअर या कंपनीची देखील त्यांनी स्थापना केली होती. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे देखील ते प्रवर्तक होते. त्यांची नेटवर्थ ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.

राकेश झुनझुनवाला नेमके कोण?

राकेश झुनझुनवाला यांची उद्योजक, गुंतवणूकदार आणि भारताचे वॉरेन बफे अशी ओळख होती. राकेश झुनझुनवाला यांचे वडील प्राप्तिकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी अकासा एअरचा लाँचिंग सोहळा हा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यामुळं सार्वजनिक कार्यक्रमात ते व्हीलचेअरवरुन सहभागी होत असतं.

फोर्ब्ज मासिकाच्या आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला हे भारतातील ३६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. गुंतवणूक आणि व्यापार या दोन्हीमध्ये यश मिळवलेले अशी त्यांची ओळख होती. झुनझुनवाला हे ले फटाफट दे फटाफट अशा पद्धतीनं ट्रेडिंग करत होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार