एरंडोल न. पा. तर्फे माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२अभियानातंर्गत बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल :- नगरपालिका स्तरावर माझी वसुंधरा अभियान २० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत बक्षिस वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून विनय गोसावी उपविभागीय अधिकारी, एरंडोल तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुचिता चव्हाण तहसिलदार, अविनाश दहिफळे पोलिस उप निरिक्षक, डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे हे होते. कार्यक्रमांची सुरुवात स्वामी विवेकानंद व राज माता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन करुन करण्यात आली.कार्यक्रमांचे अध्यक्ष विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्या प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी बॅकची आवश्यकता आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करताना प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण मुख्याधिकारी विकास नवाळे व इतर मान्यवर

त्याप्रमाणे आपल्यासाठी ऑक्सीजन घेणेसाठी झाडे लावणे आवश्यक आहे. एरंडोल शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवशी एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे तसेच सदर विविध स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थी व बक्षिस पात्र विद्यार्थीचे अभिनंदन केले. तसेच एरंडोल नगरपालिका मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम चांगले प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे.माझी वसुंधरा अभियान २० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत दि.२८/१२/२०२१ व ०३/०१/२०२२ रोजी झालेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन प्रथम, द्वितीय, तुत्तीय व उत्तेजनार्थ यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, ट्रॉफी व झाडाचे रोप देवून सन्मानित करण्यात आले.

तसेच या स्पर्धासाठी परिक्षक म्हणून लाभलेले शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी तर प्रस्तावना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विकास पंचबुध्दे, डॉ. अजित भट, डॉ. योगेश सुकटे, विवेक कोळी, महेंद्र पाटील, देवेंद्र शिंदे, आनंद दाभाडे, अनिल महाजन, विक्रम घुगे, राजेंद्र घुगे यांनी परिश्रम घेतले.

टीम झुंजार