अकोला : – अकोल्यात कत्तल करण्याच्या उद्देशाने गायी व वासरांना बांधून ठेवले आहे, असा संशय पोलिसांना आला. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर पोलिसांनी हे सर्व ४५ गोवंश ताब्यात घेत गोरक्षण संस्थेमध्ये पाठवले आहेत. ही कारवाई शनिवारी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये केली. जिल्ह्यातील पातूर इथे अकोला ते वाशिम बायपास हायवेला लागून असलेल्या खुल्या जागेत ४५ गोवंशाना कत्तलीच्या उद्देशाने चाऱ्या पाण्याशिवाय बांधून ठेवले आहेत. सैय्यद आसिफ उर्फ हाफीज याने हे गोवंश बांधून ठेवले होते, या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केलीय.
कागदपत्राचा पूर्तता नाही
खुल्या जागेत एका व्यक्तिने गोवंश बांधून ठेवल्याचे दिसले. सैय्यद आसिफ उर्फ हाफीज सैय्यद खुर्शीद (वय ३२, राहणार शाहबाबू दर्गा जवळ गुलतुरा प्लॉट, मुजावरपुरा पातूर) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली पोलिसांनी केली. पण पोलिसांना त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच त्याच्या ताब्यातील असलेले गोवंश मालकीचे हक्काबाबत आणि शेतीबाबत विचारणा केली. यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले आणि कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. त्याने अवैधपणे कत्तलीसाठी गोवंश आणले आहेत, असा संशय पोलिसांना आला.
४५ गोवंशासह पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
गोवंशाच्या चाऱ्यापाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ४५ गोवंश (ज्यांची अंदाजे किंमत ५ लाख ९२ हजार रूपये आहे) ताब्यात घेतले आणि म्हैसपूर येथील आदर्श गोरक्षण संस्थेत दाखल केले. आरोपीला कारवाईसाठी पातूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीने त्याचे साथीदार म्हणून शेर खान आबेद खान व शहजाद खान अहमद खान (दोघेही राहणार दुल्हे प्लॉट, मुजावरपुरा पातूर) व सैय्यद अहमद सैय्यद अयुब उर्फ मुन्न्या (रा. मुजावरपुरा पातूर) असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, सागर हटवार यांनी केली.
मध्यप्रदेशातून अकोलामार्गे गोवंशांची तस्करी
मध्यप्रदेशातून अकोलामार्गे गोवंशांची मोठी तस्करी होतेय. त्यामुळे अकोला हे विदर्भातील गोवंश तस्करीचं केंद्र बनल्याची समोर आली आहे. कारण अकोला जिल्ह्यातील हिवरखेडपासून काही अंतरावरच सातपुडा पर्वत आणि मेळघाट सुरू होतो. मध्यप्रदेशचं प्रवेशद्वार म्हणून हा परिसर ओळखला जातो. येथून पायी जनावरे आणण्यास मनाई मनाई आहे. असे असताना गुरांच्या तस्करीसाठी वेगवेगळी पद्धत अवलंबत लपून छपून गोवंश तस्करीचा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. अनेकदा वनविभाग आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात येथून गोवंशाची सुटका केली आहे.
गोवंशाची वाहतूक सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष
गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर अनेक तस्करांवर पोलिसांकडून मोठ्या शिताफीने कारवाई करण्यात येते. प्रत्येक वेळी पोलीस आपली चोख भूमिका निभावतात आणि गोवंशांना जीवनदान देतात. त्याप्रमाणेच अकोला पोलिसांनी शेकडो गोवंशांना जीवनदान दिले हे प्रशंसनीय आहे. परंतु कत्तलीसाठी जनावरांची तस्करीकरिता अकोला जिल्ह्यातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. पोलिसांकडून वारंवार करण्यात येणारी कारवाई आणि त्यात जप्त करण्यात येणारी जनावरे यांची संख्या पाहता ही बाब समोर येतंय. मात्र, असे असतानाही दररोज मोठ्या प्रमाणात जनावरे भरलेली वाहने जिल्ह्यातून जात आहेत. मात्र, याकडे पोलीस दुर्लक्ष करताहेत.
हे वाचलंत का ?
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.