लघुवाद न्यायालयात ६६ खटले निकाली ! एमटीएनएलची ८.५ लाखांची वसूली

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत लघुवाद न्यायालयात ६६ प्रकरणे निकालात निकाली. तसेच मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत ठेवण्यात आलेल्या महानगर टेलिफोन निगमच्या १११ प्रकरणांचा निकाल लागून ८,४७,९१५ रुपयांची वसूली झाली. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश सर्वश्री एस. एस. कदम, एम. एस. अग्रवाल, आर. बी. पारवेकर, डी. एस. दाभाडे, ए. एम. कुलकर्णी, के. आय. खान, आर. आर. खान व ए. बी. होडावडेकर तसेच

वकील सर्वश्री असिफ ए. आर. शेख, सरिता खैरकर, डी. पी. चाचा, मदनेश सिंग, श्वेता चुरी, अपर्णा म्हात्रे, अशफाक शेख, पंकज ठक्कर तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री शंकर परब, नफीसा शमीम, अनिता कदम, अशोक शिंदे, प्रतिक्षा विचारे, सिद्धी चव्हाण, अविनाश पांड्ये, अनिल गणाचार्य यांनी काम पाहिले. लोकअदालतचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक निलम शाहीर, मीना शृंगारे, अतुल राणे व कर्मचारी वृंद यांनी केले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार