पैशांसाठी सासरच्या मंडळींचा छळ, विवाहितेने माहेरी येत संपविले जीवन, गुन्हा दाखल

Spread the love

पाचोरा : -. सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच रक्षाबंधना निमित्त माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने 13 ऑगस्ट रोजी राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली होती. उमा सनी उमप असे या मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून उमा सनी उमप हिने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

शेवाळे, ता.पाचोरा येथील उमा नानू फादगे (20) हिचा विवाह जळगावच्या खंडेराव नगरातील सनी प्रेमनाथ उमप यांच्याशी शेवाळे येथे 18 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडला होता. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती याने गाडी घेण्यासाठी माहेरहून विवाहितेला ५० हजार रूपये आणण्याची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून पती सनी उमप याने पत्नी उमा हिला शिवीगाळ करून तू जर पैसे आणले नाही तर तु फाशी घेवून मरून जा किंवा विषारी औषध घेवून मरून जा परत मला तुझे तोंड दाखवू नतो असे बोलून मारहाण केली.

तसेच विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहिते माहेरी निघून आल्या होत्या. विवाहिता माहेरी असतांना गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत अखेर १५ ऑगस्ट रोजी विवाहितेच्या आई रत्नाबाई नानू फाजगे रा. शेवाळे ता. पाचोरा यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सनी उर्फ खेडू प्रेमराज उमप, गिताबाई प्रेमनाथ उमप, सासरे प्रेमराज उमप आणि गुड्डी उमप सर्व रा. रेल्वे पुलाच्या बाजूला खंडेराव नगर, जळगाव यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार