Maharashtra Assembly Session: भाजपचे आमदार आशिष शेलार याठिकाणी आले तेव्हादेखील मविआच्या आमदारांनी अशाच घोषणा दिल्या. तेव्हा मात्र, शेलार यांनी हजरजबाबीपणा दाखवत मजेत हाच उंचावून विरोधकांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यानंतर शिंदे गटाचे (Eknath Shinde camp) अनेक आमदार विधानभवनापाशी पोहोचले तेव्हा मात्र शिवसेना आक्रमक होताना दिसली. महाविकास आघाडीतील आमदारांच्या अंगात एकाएकी स्फुरण चढले
मुंबई :-Vidhansabha Adhiveshan: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे वादळी ठरताना दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार तेथूनच जात होते. यावेळी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विधानभवनाच्या जवळ आले. त्यावेळी महाविकास आघाडीतील आमदारांच्या अंगात एकाएकी स्फुरण चढले. त्यांनी संजय शिरसाट यांना बघून,’बघता काय सामील व्हा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
नेमक्या त्याचवेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत उभे होते. संजय शिरसाट यांना पाहताच धनंजय मुंडे यांच्याही अंगात उत्साह संचारला आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक घोषणा दिली. ‘अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार याठिकाणी आले तेव्हादेखील मविआच्या आमदारांनी अशाच घोषणा दिल्या. तेव्हा मात्र, शेलार यांनी हजरजबाबीपणा दाखवत मजेत हाच उंचावून विरोधकांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार विधानभवनापाशी पोहोचले तेव्हा मात्र शिवसेना आक्रमक होताना दिसली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी,’आले रे आले, गद्दार आले’, ‘५० खोके आले आले’, अशा घोषणा दिल्या. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. अवघ्या आठवडाभराच्या या अधिवेशनात कामकाजाचे दिवस फार कमी आहेत. मात्र, इतका कमी कालावधी असतानाही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सत्तापालटानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले जाईल. या सगळ्याला शिंदे-फडणवीस सरकारेच मंत्री कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.