सुनसगावात शोककळा; नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव :- आसोदा रेल्वे गेट समोर धावत्या रेल्वेखाली तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपुर्वी तरूणाच्या वडीलांनी देखील धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लखन संजय सोनवणे (वय-२२) रा. सुनसगाव ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह वास्तव्याला आहे. सुनसगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. बाहेर जावून येतो असे घरात सागुन गेलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खंबा क्रमांक ४३३/२१ येथे पवन एक्सप्रेस समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातील ओळख पटलेली नव्हती. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली होती. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन वर्षांपुर्वी लखन सोनवणेचे वडील संजय सोनवणे यांनी अंदाजे दोन वर्षांपुर्वी याच पध्दतीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे सुनसगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयताच्या आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परिवार आहे.
कुटुंबियांना दुसरा धक्का
दोन वर्षांपुर्वी लखनचे वडील संजय सोनवणे यांनी अशाच पद्धतीने धावत्या रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केली होती, अशी माहिती लखनच्या नातवाईकांनी दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे सोनवणे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. मृत लखनच्या पश्चात आई रंजनाबाई, दोन भाऊ असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.