ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

Spread the love

एरंडोल-येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,सकाळचे तालुका बातमीदार आल्हाद जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी सुरोदय ज्येष्ठ संघाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी आणि आनंदी जिवन जगावे असे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी ज्येष्ठ नागरिक समाजाचे मार्गदर्शक असल्याचे सांगितले.सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी संघातील सर्व सभासद एकत्रितरीत्या काम करीत असल्यामुळे सर्व यशस्वी होत असल्याचे सांगितले.संघातर्फे अनेक वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असून त्याचे सभासदांना विनामूल्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.संघाचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी संघामार्फत राबविण्यात येणा-या कार्यक्रमांची माहिती दिली.यावेळी प्रा.शिवाजीराव अहिरराव,आनद दाभाडे,आल्हाद जोशी यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप,कवी निंबा बडगुजर,निवृत्त शिक्षक पी.जी.चौधरी,वसंतराव पाटील,विश्वनाथ पाटील,गणेश पाटील,भगवान महाजन,नामदेव पाटील,जगन महाजन,सुपडू शिंपी,सुभाष दर्शे,बाळू लोहार,भास्करराव बडगुजर यांचेसह संघाचे सभासद व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.फोटो ओळी-एरंडोल येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना प्रा.शिवाजीराव अहिरराव,आनद दाभाडे,आल्हाद जोशी,अध्यक्ष अरुण माळी व पदाधिकारी.

टीम झुंजार