कार्यक्रमात पडला मासचा विसर..
पूर्णा प्रतिनिधी सय्यद कलीम
पूर्णा तालुक्यातील कानडखेडा येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सिताराम कोठारे होते तर यावेळी आदींची उपस्थिती होती यावेळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटनानंतर संयोजक अशोक वाघमारे सर्फराज पठाण यांनी उपस्थितांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.
तर यावेळी क्रिकेट स्पर्धा उद्घाटना नंतर बोलताना बाबाजानी दुर्रानी यांनी सांगितले की माणसाला कामासोबत व्यायामाची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण झाली पाहिजे. यासाठी क्रिकेट स्पर्धा महत्त्वाची असून या स्पर्धांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मता निर्माण होण्यास मदत होते. यावेळी त्यांनी कानडखेडा येथे ईदगाह मैदानासाठी खंडोबा मंदिरासाठी आगामी काळात मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच यावेळी त्यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
राज्यातील महा विकास आघाडी सरकार हे सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर व समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.त्यामुळे आज सगळीकडे विकासात्मक दिसत असून,शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विकास कामांसाठी आगामी काळात सर्वतोपरी मदत केली जाईल.अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.
पूर्णा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी आता पर्यंत आले नव्हते .पुढे पुर्णा नगर पालिकेची निवडणूक आहे त्यामुळे आले असतील अशी उलट सुलट चर्चा सुरू होती .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक वाघमारे सरफराज पठाण उस्मान पठाण सत्तार खान पठाण सय्यद अली सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.