शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधक आमने – सामने आले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी खडसावलं होतं.
मुंबई : – पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Rainy Session) दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) या गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत झापलंय. छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी झालेल्या गदारोळात विरोधही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. जोरदार गदारोळ यावेळी पाहायला मिळाला
सभागृहात नेमकं काय घडलं?
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या गदारोळादरम्यान, संपातल्या होत्या. वारंवार विनंती करुनही आमदारांचा गदारोळ सुरुच होता. यावेळी झालेलं संभाषण नेमकं काय होतं, ते जाणून घ्या…
वाचा नेमकं काय घडलं?
- डॉ. नीलम गोऱ्हे: गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? परत परत सभापती सांगतायत, ही कुठली पद्धत आहे? चौकात आहात का तुम्ही?
- गुलाबराव पाटील – मी मंत्री आहे!
- डॉ. नीलम गोऱ्हे – मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बस. हे सभागृह आहे. दरेकरजी काय चाललंय? अहो शांत राहा…
नेमका वाद का झाला?
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधक आमने – सामने आले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. गुलाबराव पाटलांना निलम गो-हेनी झापलं. गुलाबराव पाटील यांना झापताना, छातीवर हात बडवून काय बोलता? असं म्हणतं गोऱ्हे यांनी झापलंय.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.