स्वातंत्र्यदिनी हत्या; दुसऱ्या दिवशी डोेके, हात कापून नेले, तिसऱ्या दिवशी धड.
Aurangabad Crime News: सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने प्रेयसीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे
औरंगाबाद :- मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद जिल्हा आज एका खुनाच्या घटनेनं हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर म्हणून गावातील एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या विवाहित तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
कुटुंबाला देखील ही बाब कळली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्यानंतरही दोघांनी प्रेमसंबंध कायम ठेवण्याचे ठरवले. त्यानंतर अंकिता अनिल श्रीवास्तव (२४) ही तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला सोडून शहरात एकटी राहू लागली. तिचा प्रियकर सौरभ बंडोपंत लाखे (३५) तिला भेटायला यायचा. मात्र, अंकिताने लग्नाचा तगादा सुरू करताच वाद सुरू झाले.
त्यांच्या विवाहबाह्य संबंधातील तणाव टोकाला गेले. अखेर १५ ऑगस्ट रोजी सौरभने हडकोतील डीमार्टसमोर राहणाऱ्या अंकिताची खोली गाठून गळा आवळून क्रूरपणे हत्या केली. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या कशिश हिचा २२ मे राेजी गळा कापून खून करण्यात आला हाेता. मूळ जालना येथील सामान्य कुटुंबातील अंकिताचे साडेतीन वर्षांपूर्वी शिऊर येथील मिठाई व्यावसायिक महेश श्रीवास्तव साेबत लग्न झाले.
या दांपत्याला तीन वर्षांची अपंग मुलगी आहे. घरासमोरच राहणाऱ्या सौरभसोबत अंकिताची ओळख झाली. काही दिवसांत ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या कुटुंबांना ही बाब समजल्यानंतर त्यांना समजावून सांगितले. मात्र, तेे नाते संपुष्टात आणायला तयार नव्हते. लॉकडाऊनदरम्यान अखेर हा वाद शिरूर पोलिस ठाण्यात गेला. काही दिवस शांत राहिल्यानंतरही त्यांनी पुन्हा भेटणे सुरू केले. डिसेंबर २०२० मध्ये अंकिता घर सोडून निघून गेली. तेव्हा तिला शोधून आणले. मार्च २०२२ मध्ये पुन्हा अंकिता घर सोडून निघून गेली. त्यानंतर मात्र तिचा पती व कुटुंबाने पुन्हा तिची समजूत घालण्यासाठी पुढाकार घेतला नाही. काही दिवस माहेरी राहून अंकिता पुन्हा औरंगाबादला आली. सौरभसाेबत मिळून तिने डीमार्टसमोरील नवजीवन कॉलनीत मुख्य रस्त्यावर प्रवीण सुतार यांच्या घरात तळमजल्यावर दोन महिन्यांपूर्वी खोली घेतली.
नाकेबंदीत सापडला :
पोलिसांनी कुलूप तोडले तेव्हा अंकिताच्या खोलीत गादीवर रक्त सांडलेले होते. फरशीवरचे रक्त वाळलेले होते. सुतार यांनी सौरभला कॉल केला असता मी खुलताबादला आलाेय, असे सांगितले. पवार यांनी तत्काळ ग्रामीणच्या नियंत्रण कक्षाला कळवून गाडी अडवण्यास सांगितले. देवगाव रंगारी पोलिसांच्या नाकेबंदीतत ताे धडासह सापडला. त्यानंतर सिडकोचे उपनिरीक्षक अशोक अवचार तत्काळ पथकासह त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरा त्याला शहरात आणून अटक करण्यात आली. धार्मिक कार्यात सहभाग, पाच दिवसांनंतर प्रेयसीची हत्या : अंकिताच्या माहेरी आई, वडील असून विवाहित भाऊ आहे. सौरभने बारावीनंतर डीएड केले होते. गावातील शंकरस्वामी मंदिरासमोर फर्निचरच्या दुकानासह तो पत्रकार म्हणून विविध स्थानिक वृत्तपत्रांना बातम्या पुरवत होता. चार बहिणींच्या पाठीवर झालेला सौरभ एकुलता एक मुलगा होता. वडील सेवानिवृत्त शिक्षक तर आई अंगणवाडी सेविका होती. सौरभला पत्नीपासून सात वर्षांची मुलगी असून सध्या ती गर्भवती आहे.
१० ऑगस्टपर्यंत गावातल्या एका धार्मिक कार्यक्रमात सातही दिवस तो दिवसभर सक्रिय होता. त्याच्या पाचच दिवसांनंतर त्याने क्रूर हत्या केल्याने ग्रामस्थांना धक्का बसला. त्याने ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील लढली होती. मात्र, तो पराभूत झाला.खोलीत दारूच्या बाटल्या, दोन दिवस रूम फ्रेशनर घेऊन आला : पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताच्या खोलीत एक शॅम्पेन व एक बिअरची बाटली होती. शिवाय, एक दिवस तो हातात रूम फ्रेशनर घेऊन येताना त्याला काहींनी पाहिले होते. त्यामुळे खोलीतील दुर्गंधी जाण्यासाठी तो सोबत रूम फ्रेशनर घेऊन येत होता. त्याने आदल्या दिवशी नेलेले डोके व हात त्याच्याच दुकानाच्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. सौरभच्या घराच्या परिसरात स्मशानशांतता पसरली होती. त्याच्या घराचा दरवाजा लावलेला होता. ग्रामस्थ, मित्रांनी देवगाव रंगारी गाठली. मित्रांनी त्याला विचारले, हे काय केलेस, चेहऱ्याने भावनाशून्य झालेला सौरभ, ‘डोक्यावरून चालली होती, तुम्ही माझ्या घरच्यांना धीर द्या,’ एवढेच म्हणाला.
वास येऊ नये म्हणून मृतदेहावर परफ्यूम मारले
सुमारे दोन दिवसापूर्वी हत्या झाल्याने प्रेत कुजले होते. खोलीतून वास येत होता. मृतदेहाचा वास येऊ नये व कुणाला संशय येऊ नये म्हणून आज सकाळी जेव्हा सौरभ हा अंकिताच्या खोलीत गेला तेव्हा परफ्यूम त्याने मृतदेह व खोलीत फवारले अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
रात्रभर शिऊरच्या गाेडाऊनवर ठेवले…
सौरभ अंकिताला भेटायला जातो, ती एकटी राहते हे दोघांच्या कुटुंबासह मित्रांनाही माहीत होते. सौरभ अंकितावर आपले खूप प्रेम आहे, असे मित्रांना सांगायचा. मात्र, वाईट परिणाम होण्याआधी तुम्ही लग्न करा, असा सल्ला मित्रांनी देताच तो अस्वस्थ होत असे. अंकिताने मी तुला साेडून राहणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले हाेते. त्यामुळेच अंकिताने १४ आॅगस्टला त्याच्यासाेबत शिऊरला जाण्याचा हट्ट केला. त्यामुळे साैरभने तिला शिऊरला नेले. रात्रभर गाेडाऊनवर ठेवून पहाटे ५ वाजता मित्राच्या गाडीने शहरात फिरून ताे पुन्हा तिच्या खाेलीवर गेला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला.
दुसऱ्या दिवशी केले तुकडे
१६ ऑगस्ट रोजी मित्राच्या साखरपुड्याला जाण्यासाठी काहींनी त्याला फाेन केले. मात्र, काम असल्याचे सांगून नकार कळवला. सकाळी गावातील एका मित्राचा वाढदिवस असल्याने त्याला घाईत शुभेच्छा देत पुन्हा निघून गेला. त्याने पुन्हा अंकिताची खोली गाठली. आदल्या दिवशी क्रूर हत्या केलेल्या अंकिताचे त्याने अक्षरश: तुकडे केले. त्यानंतर एका पिशवीत डोके तर दुसऱ्या पिशवीत हात ठेवून दाेन्ही पिशव्या हातात घेऊन गावाकडे रवाना झाला.
भाडेकरू महिलेस आला संशय
१७ ऑगस्टला मित्राची इर्टिगा (एमएच २० सीएच ३०७६) घेऊन खोलीवर गेला. दुर्गंधी सुटलेले पोते घेऊन तो गाडीत बसला. त्यात अंकिताचे धड होते. भाडेकरू अलका गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी घरमालकाला सांगताच त्यांनी त्याला थांबवले असता “मला वेळ नाही, नंतर येतो’ असे म्हणून निघून गेला. त्यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, विनोद सलगरकर, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के यांनी धाव घेतली.
हत्या केल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली
सौरभ हा पत्रकार असून स्थानिक दैनिकासाठी काम करतो. त्याने महिलेची हत्या केल्यानंतर मी हत्या केली असल्याची माहिती पत्रकार आमि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यानंतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहितीसुद्धा ग्रुपवर टाकली.
आरोपी सौरभ लाखे हा जिल्हा पोलीस-पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सक्रीय असायचा. बुधवारी (17 ऑगस्ट) दुपारी सव्वाबारा वाजताही त्याने स्वत: ‘मी खून केला आहे’, अशी पोस्ट व्हॉट्सॲपवर टाकली.
सुरुवातीला इतर पत्रकारांना आणि पोलिसांना काही समजलं नाही. मात्र पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, आपण सिडको पोलीस ठाण्यात जात असल्याचं त्यानं ग्रुपवर सांगितलं.
त्यानंतर साडेबाराच्या सुमारास आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात असल्याची पोस्ट त्यानं टाकली.या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.दरम्यान, लग्नाचा तगादा लावल्यामुळे सौरभनं अंकिताचा खून केल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का ?
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.