भगवान मराठे प्रतिनिधी
प्रतिनिधी। जळगाव– राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज समोर आले आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन.अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या नंतर राज्य मंत्रीमंडळातील सुमारे २० मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.ना. गुलाबराव यांनी आज एका निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे जाहीर केले आहे.