एरंडोल शहर प्रतिनिधि
एरंडोल आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संस्थेचे अध्यक्ष माननीय अमितदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.ए. पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर.एस.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नरेंद्र तायडे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ संदर्भात आपले विचार प्रकट केले. तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, भारतातील प्रत्येक तरुण-तरुणींनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची ताकद भारतीयांमध्ये आहे.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गाढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.आत्माराम चिमकर प्रा.के.जे. वाघ विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.हेमंत पाटील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. शर्मिला गाडगे यांनी मानले.