पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील जवखेडी शिवारात शेताच्या बांधावर बैल चारल्याच्या कारणावरून सख्ख्या भाऊच्या डोक्यात दगड टाकल्याची घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्व्रर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष विठ्ठल धनगर (वय ४६, रा.शिंदाड, पाचोरा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी व आरोपी हे सख्खे भाऊ असून आरोपी भिकाजी विठ्ठल धनगर याने फिर्यादीच वडीलपार्जीत शेताच्या बांधावर बैल कोणी चारल्याचे विचारले असता. फिर्यादीने म्हटले की, दोन दिवसांपूर्वी मी तेथे बैल चारले होते. तू तुझे बैल आमच्या शेताच्या बांधावर चारून घे असे बोलल्याने आरोपी भिकाजी विठ्ठल धनगर राग येऊन फिर्यादी संतोष विठ्ठल धनगर याच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला दगड उचलून डोक्यात मारून दुखापत केली.
तसेच आरोपी भिकाजी विठ्ठल धनगर यांच्यसह त्यांचा मुलगा स्वप्नील भिकाजी धनगर हे दोघे मिळून फिर्यादी संतोष धनगर यांच आम्ही मारून टाकू अशी धमकी दिली. याबाबत संतोष धनगर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपी भिकाजी विठ्ठल धनगर व स्वप्नील भिकाजी धनगर दोघे रा.शिंदाड ता.पाचोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर के पाटील करत आहेत.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम