चोपड्यात पोलिसांची मोठी कारवाई ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूससह हरियाणातिल दोघे जेरबंद

Spread the love

चोपडा (प्रतिनिधी) : – जळगाव जिल्हा आणि प्रामुख्याने सातपुडा परिसरात अवैधरित्या होणारी गावठी पिस्तूल विक्री सर्वांनाच ठाऊक आहे. मध्यप्रदेशातील उमर्टी येथून मोठ्याप्रमाणात जळगावात शस्त्रे विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जळगाव जिल्हा अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालले असून गुटखा, गांजानंतर आता गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट समोर येत आहे. चोपडा येथे पोलिसांनी धडक कारवाई करत हरियाणाच्या दोघांना तब्बल घेतलं आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ गावठी कट्टे, मॅगझीनसह ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

चोपडा परिसरातच गावठी पिस्तूल विक्री करणारे रॅकेट सुरु असून मध्यप्रदेशातून आणि सातपुड्याच्या कान्याकोपऱ्यातून विक्रेते चोपड्यात येत असतात. वर्षभरात अनेकदा पोलिसांनी गावठी कट्टे विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशातच आता सोमवारी चोपडा बस स्थानक परिसरात संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (वय 30 रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी,हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरीयाणा) यांच्याकडे 2 लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किमंतीची 5 पिवळया धातूचे जिवंत काडतूस हे कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले होते.

संशयित आरोपी

परंतू पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दोघं संशयित आरोपींवर पोहेका किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींजवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर पोहेका किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींजवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार