भातखेडे येथे आढळला कुजलेल्या अवस्थेत बिबट्या..!

Spread the love
एरंडोल :- तालुक्यातील भातखेडे येथील शेतकरी सुभाष नामदेव पाटील यांच्या शेतात आज दिनांक 22 रोजी महिला कापूस वेचण्यासाठी आल्या होत्या या महिलांना दुर्गंधी आली दुर्गंधी ज्या दिशेने येत होती त्या दिशेकडे महिलावर्ग पाहण्यासाठी गेलेत त्यावेळी बिबट्या वाघ हा मृत कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला यावेळी सुभाष पाटील यांनी या घटनेची खबर पोलीस पाटील रेखाताई शामकांत पाटील यांना सांगितली यावेळी पोलीस पाटील रेखाताई पाटील यांनी या घटनेची खबर एरंडोल विभाग यांना सांगितले.एरंडोल वन विभागाचे वनक्षेत्रपाल दत्तात्रेय लोंढे , वनपाल राजकुमार ठाकरे , वनरक्षक शिवाजी माळी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी एरंडोल डॉक्टर ए. एस . महाजन , पशु संवर्धन आर एस साळुंखे वासुदेव वंजारी संजय चौधरी यांनी या मृत अवस्थेत बिबट्याचे जाग्यावर करून अंत्यसंस्कार करण्यात आला.मागे काही दिवसांपूर्वी बिबट्याने गायी व म्हशीच्या पिल्लुना फस्त केल्याची घटना घडल्या आहेत.तसेच या परिसरात बिबट्या चे लहान पिल्लु सुध्या आढळुन आले होते. फोटो ओळ:- भातखेडे शिवारात मृत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या
टीम झुंजार