जळगाव शहरात वाळू व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा मध्यरात्री खून !

Spread the love
  • जळगावात चार दिवसात तिसरा खून, मध्यरात्री तरुणाला भोसकले !

  • वाळू व्यावसायिकावर घरापासून १०० मीटरवर २४ वार, जिल्ह्यात चार दिवसांतील तिसरी हत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : – सध्या महाराष्ट्रात घातपात (खुनाच्या ) झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील खुनांची मालिका संपण्याचे नाव घेत नसून पुन्हा एकदा तरूणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.जळगाव शहर पुन्हा हादरलं असून मध्यरात्री एका वाळू व्यावसायिक असलेल्या तरुणाचा मध्यरात्री खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली असून खून झालेल्या तरुणाचे नावं भावेश उत्तम पाटील (वय २८, मुळ रा. आव्हाणे, जळगाव)असे आहे.

भावेश उत्तम पाटील (वय २८, मुळ रा. आव्हाणे, जळगाव)

शहरातील निवृत्ती नगरात भोसकून या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. खून कोणी केला व त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहरातील निवृत्ती नगरात राहणारा भावेश हा वाळू व्यवसायिक असल्याची माहिती आहे.त्याचे वडील आव्हाणे गावात राहतात तर भाऊ कपील हा सुरत येथे वास्तव्यास आहे. पत्नी व मुलीसह तो निवृत्ती नगरात राहत होता. दोन दिवसांपूर्वीच शहरात खुनाची घटना घडली असतांना जळगाव शहरात पुन्हा खुनाची घटना घडली आहे.

जळगावातल्या शिव कॉलनीत खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यावल तालुक्यात एकाची हत्या झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावात पुन्हा खून झाला. म्हणजे लागोपाठ तिसऱ्या दिवशी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपला की काय ? अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

घरापासून १०० मीटरच्या अंतरावर खून…

भावेशचा मृतदेह दोन वाजेपर्यंत घटनास्थळावरच पडून होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी दुचाकी आणि चॉपर ठेवण्याचे कव्हर आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. घरापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर हा खून करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलीचा वाढदिवस केला साजरा

मृत भावेशची पत्नी शितल आणि तीन वर्षांची मुलगी लावण्या यांचा २२ ऑगस्टला एकाच दिवशी वाढदिवस असल्याने भावेशने परिवारासह वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला होता. आनंदाचे वातावरण असताना आजच्या खूनाच्या घटनेने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी शितल, मुलगी लावण्या, भाऊ कपिल आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, मृताचा चुलत भाऊ कैलास मंगल पाटील (रा. आव्हाणे ता.जि.जळगाव) याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मनिष नरेंद्र पाटील (वय २२, रा. आव्हाणे) आणि भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द ता.जि.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र सुरवाडे हे करत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार