जळगाव : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच सुसाईड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेश रघुनाथ पांडे (वय, ७२) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे हे वास्तव्यास आहे. पांडे हे सोमवारी दुपारच्या सुमारास शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील बाकावर बसलेले होते. याचवेळी त्यांनी सुसाईड नोट लिहीत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन घेतले. ही घटना उद्यानातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्याचे संजय बडगुजर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुरेश पांडे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती बरी असल्याचं वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितलं आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं…
घटनेनंतर पोलिसांनी पांडे यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन त्यांना घटनेची माहिती दिली. सुरेश पांडे यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात आला असता, पांडे हे मनोरुग्ण असून त्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पांडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करत आहे. यात कोणीही दोषी नाही. मला ९० टक्के दिसत नाही. या आजारपणाचा आता कंटाळा आला आहे. मी स्वत: जबाबदार आहे, धन्यवाद,’ असं आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुरेश पांडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळून आलं आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.