रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Spread the love

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप करमाळा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप करमाळा: दि. १४/ करमाळा-मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त रवि शेळके, धनंजय ढेरे मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास १११ रक्तदाताने उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन दत्त मंदिर करमाळा येथे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांतील रक्तदातांनी येथे येऊन रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला आहे.

रवि शेळके, धनंजय ढेरे मित्रपरिवाराच्या वतीने सांगण्यात आले आले की, सध्या अजून ही कोरोनाचे सावट महाराष्ट्रावर आहे. आमचे नेते दिग्विजय बागल यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करुनच हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस होता. येथे तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या रक्तदातांनी आम्हाला सहकार्य केले. आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास आलेल्या प्रत्येकांचे आम्ही आभार मानतो.

या रक्तदान शिबिरासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव देवकर, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश बापू निळ ,हरिश्चंद्र झिंजाडे, नामदेव भोगे, सचिन पिसाळ , जोतीराम लावंड,डॉ अविनाश घोलप, डॉ लावंड,नगरसेवक सचिन घोलप, अक्षय कुलकर्णी, संतोष गायकवाड, नितीन खटके, नवनाथ घरबुडे,हनुमंत पाटील सर, कांतीलाल माने सर, अनुराधा बागल मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टीम झुंजार