दुकान होतं जडीबुटीचं पण आतमध्ये जाताच पोलीस हैराण, असं काही होतं जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल

Spread the love

वन विभागाची मोठी कारवाई : जळगावातील कोगटा दुकानातून वन्यजीवांचे ३४७ प्रकारचे अवशेष जप्त!

जळगाव :- जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील भवानी पेठेतील जडीबुटीची औषधींची विक्री करणाऱ्या दुकानात मंगळवारी वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत दुकानातून असं काही समोर आलं की पोलीसही हादरले आहेत.

जप्त केलेली वन्यप्राण्यांचे अवशेष

मिळालेल्या माहितीनुसार, दुकान होतं जडीबुटींचं पण यात मात्र वन्य जीवांचे अवशेष आढळून आले असून दुकान मालकासह दोन जणांना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. वन्यप्राण्यांची शिकार व तस्करी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अजय लक्ष्मीनाराण कोगटा (वय-५३) रा. जळगाव, चुनीलाल नंदलाल पवार (वय-३०) रा. खेडागाव तांडा. ता. एरंडोल आणि लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय-५४) रा. जळगाव अशी अटकेतील संशयितांची नावे आहे.

जळगाव शहरातील भवानी पेठेतील मे. रामनाथ रामनाथ मुलचंद कोगटा या वनऔषधी व जडीबुटीच्या दुकानात वन्यजीवांची शिकार करून वन्यजीवांच्या अवशेषाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी दुकानावर छापा टाकला.

या छाप्यात हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3, समुद्रघोडा 2 या वन्यप्राण्यांचे अवशेष वन विभागाच्या पथकाने दुकानातून जप्त केले आहेत. या प्रजातींचा समावेश वन्यजीव कायदा 1972 मधील परिशिष्ठ 1 व 2 मध्ये समावेश आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी 7 वर्ष कारावासाची तरतूद आहे.

संशयित आरोपी

असा टाकला छापा

वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. इतरही एका ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती होती. वन्य प्राण्यांच्या अवशेषांची कोगटांच्या दुकानात विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला.

पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करीत आहे. दरम्यान या दुकानात गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत असून भरवस्तीतील प्रसिध्द दुकानात केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार