पारोळा :- तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका असुन येथिल शेतक-यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेतीला शेतीशी संबंधीत इतर व्यवसायाची जोड धंदा दिल्या शिवाय शेतक-यांची प्रगत्ती होणे शक्य नाही हे ओळखुन मा प्रकल्प संचालक आत्मा श्री संभाजी ठाकुर तसेच पारोळा तालुका कृषी अधिकारी श्री भरत वारे यांचे मार्गदर्शना खाली जळगाव जिल्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषी विभागा मार्फत शेततळ्यातील मस्त्स पालन या विषयावर तालुक्यातील शेतक-यां करीता शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले
या प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी फिशरीज प्रा. लि. या कंपनीचे संचालक श्री परमेश्वर कांबळे व श्री राजेंद्र काळे तसेच पोक्रा योजनेचे श्री संजय पवार हे उपस्थित होते.

यात त्यांनी शेततळ्यातील मस्त्सपालन कसे फायदेशिर आहे व या करीता शासकीय योजनेची जोड कशी देता येईल या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री सचिन लांडगे यांनी पिक एमई या योजने विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रविण ठाकरे यांनी केले.या प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्या करीता गावातील श्री मल्हार कुंभार, जितेंद्र पाटील तसेच गावातील शेतक-यांनी विषेश परिश्रम घेतले.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम