जळगाव :- एकलव्य संघटनेच्या वतीने तसेच एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या आदेशानुसार आज जळगांव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जळगाव तहसीलदार, जळगांव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना जळगाव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) श्री.निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष श्री. राहूल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की जळगांव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने स्वतंत्रपूर्वी काळापासून वास्तव्य करत असून आजही हा समाजात घरकुल, रेशनकार्ड, पासून वंचित आहे केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर गोरगरीब कुटूंबांना घर देण्याचे ठरवले असून आजही मोठ्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज हा ह्या योजना पासून दूर आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला प्रधानमंत्री, शबरी, आवास योजना राबविण्यात येत आहेत परंतु ह्या योजनेचा लाभ सरपंच, ग्रामसेवक, आर्थिक भ्रष्टाचार करून गरजू लाभार्थ्यांना ( ड ) यादीतून वगळून जे आर्थिक परिस्थितीत भक्कम आहेत अश्या बोगस लाभार्थ्यांना लाभ येत असून ह्या प्रकरणात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन व तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना देऊन नव्याने प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसेवक मार्फत नव्याने गरजू आदिवासी समाजाचे नावे ( ड ) यादी मध्ये समावेश करून घेण्यात यावे व आर्थिक भ्रष्टाचार करून आर्थिक परिस्थिती भक्कम असणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच जळगांव तहसिल कार्यालयात नविन रेशनकार्ड साठी व ऑनलाईन (S.R.C) बारा अंकी नंबर साठी पुरवठा कार्यालयाचे 2, 3, महिने चक्कर वर चकरा मारूनही वेळेत काम पूर्ण होत नाही.
अश्या बेशिस्त अधिकारी कर्मचारी यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात यावी व नविन जुने रेशनकार्ड, वर (S.R.C) बारा अंकी नंबर तात्काळ टाकून देऊन ते रेशनकार्ड चालू करून त्यावर वंचित लाभार्थ्यांना धान्य देण्यात यावे अन्यथा एकलव्य संघटना जिल्ह्यातील आंदोलने करेल असे निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी निवेदन देतांना जळगांव जिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) श्री. निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष श्री.राहुल ठाकरे तालुका सोशल मिडिया प्रमुख श्री.सुनिल सोनवणे श्री. दिपक सोनवणे श्री. धनराज पवार श्री. लहू अहिरे श्री. रविंद्र मोरे श्री. रामचंद्र मोरे श्री. हिलाल बोरसे श्री. मनीलाल सोनवणे श्री. राहुल गायकवाड श्री. रविंद्र सोनवणे श्री. मच्छिंद्र सोनवणे श्री. अजय मोरे श्री. समाधान मोरे श्री. जितेंद्र मोरे श्री. सीताराम मोरे श्री. योगेश सोनवणे श्री. विजय पवार श्री. महेंद्र मोरे श्री. अजय पवार श्री. आनंद मोरे आदिसह समाज बांधव उपस्थित
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.