मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादींच्या कालावधीमध्ये परीक्षा न घेणे व शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणांच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ यांच्या सहमती अनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी व अन्य सण / उत्सव कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करु नयेत अशा सूचना दिल्या आहेत.
तथापि राज्य मंडळांच्या शाळां व्यतिरिक्त इतर खाजगी शाळांमध्ये सदर सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच पालघर परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात आपल्या मूळगावी जात असतात.
त्यामुळे गणेशोत्सवात ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. तसेच या काळात कोणत्याही परीक्षा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना आपण सर्व शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांना कराव्यात. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना दिले.
गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात. शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितले आणि आज तातडीने सदर आदेश संबंधित विभागांकडे रवाना केला.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.