धक्कादायक ; मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून, बैल पूजनाची लोखंडी पास घालून हत्या.

Spread the love

मोठ्या वहिनीबद्दल आक्षेपार्ह इच्छा; मोठ्या भावाने धाकट्यासोबत केलं असं काही की सगळेच हादरले!

चाळीसगाव :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एक मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचे कारण ऐकून घरातील सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. बैलपोळ्याचा सण साजरा करत असतानाच कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बैल पोळ्याच्या दिवशी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन खुन करणाऱ्या मोठ्या मुलाविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अभोणे गावात बैल पोळा सण उत्साहात साजरा झाला. तर दुसरीकडे अवघ्या तालुक्याला हादरवणारी घटना घडली. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (वय 35) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (वय 30) हे घरी बैल पूजनासाठी आले. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ शिवाजी पाटील याने मोठ्या भावाच्या पत्नीबद्दल अपशब्द बोलुन विनयंभग केला. त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

असा केला खून

पुढे या वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता. बैल पूजनासाठी लोखंडी पास ठेवण्यात आली होती. मोठ्या भावाने पिंटूने तीच पास घेऊन लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर 3 वार केले. डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे लहान भाऊ शिवाजी जागीच गतप्राण झाले. त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळाचा पंचनामा

प्राप्त माहितीनुसार दोघे भाऊ दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे अभोणे गावात प्रचंड खळबळ उडाली. नागरीकांनी सण देखील साजरा केला नाही. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. मृत शिवाजी पाटील याची आई लताबाई तुकाराम पाटील (वय 60) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिंटू पाटील याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णु आव्हाड तपास करीत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार