जळगाव :- राज्यभरात मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा होत असताना जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐन पोळ्याच्या दिवशी नागरीकांनी बैल बिथरवला. हा बैल एका घराच्या छतावर चढला होता. यानंतर पुन्हा बैलाजवळ गर्दी, गोंधळ केल्याचे बैल छतावरुन खाली पडला. शनिवारी सकाळी या बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
जळगाव जिल्ह्यातील वावडदा गावात ही घटना घडली. गावात बेकायदेशीरपणे बैलांना वागणूक दिली गेल्याचा हा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात अनेक गावात परवानगी नसताना देखील बैलांच्या शर्यती घेण्यात आल्या. यात बैलांना अमानुष वागणूक देण्यात आली. पाठीवर चाबुक मारुन, शेपट्या पिळून बैलांना पळवले जात होते. तर असाच एक प्रकार वावडदा गावात घडला. या गावात बैलाच्या मालकाने गावात बैल पळवल्यामुळे तो बिथरला. लोक आरडाओरड करीत असल्यामुुळे दमलेला बैल एका घराच्या छातवर चढला होता.
या छतावरुन बैलास खाली उतरवण्यासाठी एकच गर्दी झाली. काही जण जिन्यात थांबले, तरुणांनी रस्त्यावर गोंधळ घातला. यामुळे बैल पुर्णपणे बिथरला होता. लोकांच्या गोंधळामुळे त्याला काहीच कळत नव्हते. अखेर जिना नसलेल्या बाजुने बैलाने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. या बाजुने छताला संरक्षक भिंत नव्हती. तर मागच्या बाजुने तरुणांचा गोंधळ सुरूच होता. अखेर या बैलाने संरक्षक भिंत नसलेल्या कडेने खाली झोकुन पाहिले. परिणामी बैलाचा तोल गेला.
पहा व्हिडिओ :
जिवाच्या आकांताने बैलाने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु वजन जास्त असल्यामुळे सुमारे 20 फुट उंचीवरुन हा बैल जमीनीवर कोसळला. बेशुद्ध व जायबंदी झालेल्या बैलाच्या तोंडा, नाकातून रक्त वाहत होते. शुक्रवारी रात्री त्याच्यावर उपचार करण्यात आले. शनिवारी सकाळी बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वन्यजीव संरक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वावडदा गाव व रुग्णालयात जाऊन चौकशी केली. घडलेल्या प्रकाराबाबत वन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगीतले. दरम्यान, या घटनेनंतर वावडदा गावात अनेक शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला नाही.
शांतता असती तर वाचला असता जीव
वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे म्हणाले की, कोणत्याही पाळीव, वन्य प्राण्यास मानवी हस्तक्षेप सहन होत नाही. लोकांनी शांत राहिले असते तर ज्या जीन्यावरुन हा बैल छतावर चढला होता, त्याच मार्गाने स्वत: खाली उतरला असता. त्यासाठी गावातील लोकांनी गोंधळ घालण्याची काहीच गरज नव्हती. लोकांच्या आरडाओरडमुळे बैल बिथरला होता.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.