ऐकावे ते नवलच : उसाच्या शेतात गांजाची लागवड, कोट्यवधींची झाडं जप्त

Spread the love

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या शिपूर या ठिकाणी उसाच्या शेतात करण्यात आलेल्या गांजा शेतीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. शिपूर येथील नंदकुमार बाबर यांच्या बाबर मळा, गट नंबर ३१३ मध्ये ३० गुंठ्यामध्ये चार फुटांवर एक अशी गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिरज उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती.

सांगली :- उसाच्या शेतात सुरू असलेली गांजाची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. मिरजेच्या शिपूर येथे तब्बल पाऊण एकरमध्ये गांजा शेतीची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कोट्यावधी रुपयांची ४०० गांजाची झाडे जप्त करत या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

मिरज तालुक्यातल्या शिपूर या ठिकाणी उसाच्या शेतात करण्यात आलेल्या गांजा शेतीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. शिपूर येथील नंदकुमार बाबर यांच्या बाबर मळा, गट नंबर ३१३ मध्ये ३० गुंठ्यामध्ये चार फुटांवर एक अशी गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिरज उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती.

त्यानुसार शुक्रवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बाबर यांच्या शेतात छापा टाकला. तेव्हा याठिकाणी उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजा लागवड करण्यात आल्याचे समोर आले. ही गांजाची शेती पाहून पोलिसही अवाक् झाले होते. २० गुंठ्यांत पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडं आणि १० गुंठ्या मध्ये गांजाची लहान झाडं आढळून आली आहेत.

या छाप्यामध्ये सुमारे ४०० गांजाची झाडे उखडून जप्त करण्यात आली आहेत. याची बाजारभावनानुसार कोट्यावधी रुपयांची किंमत असून उशिरापर्यंत या गांजाच्या झाडांचं वजन करण्याचे काम सुरू होतं. तर या गांजाशेती प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार