मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जोर दिसतोय. ते पक्षात काही अंतर्गत बदल करत आहेत. शिवसेनेप्रति निष्ठा बाळगून असलेल्या नेत्यांना त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवर घेतलं आहे. शिंदे गटाच्या बंडाशी आक्रमक आणि रोखठोक शैलीत उत्तरं देणाऱ्या दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदार संघातील खासदार अरविंद सावंत यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली आहे. तर आमदार भास्कर जाधव यांच्या खांद्यावरही पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सचिवपदी पराग लीलाधर डाकेंची निवड करण्यात आली आहे.
अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार आहेत. १९९५ मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. १९९६ मध्ये अरविंद सावंत विधानपरिषदेवर आमदारपदी निवडून आले. २०१० मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेना प्रवक्ते म्हणून बढती मिळाली. २०१४ मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता.
परंतु देवरांचा तब्बल एक लाख २० हजारांच्या मताधिक्क्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते अवजड उद्योग मंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते शिवसेनेचे एकमेव मंत्री होते. हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद शिवसेनेकडे होतं. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार होत असताना भाजपसोबत काडी मोड घेण्यात आला. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. आताही ते आक्रमकपणे सेनेची बाजू मांडतात.
भास्कर जाधव हे गुहागरचे शिवसेना आमदार आहेत. ते आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. विधिमंडळात आपल्या मुद्देसूद मांडणीने ते विरोधकांना घाम फोडतात. प्रभावी वकृत्वशैली आणि करारी बाणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. तर सचिवपदी पराग लीलाधर डाकेंची निवड करण्यात आली आहे. ते निष्ठावंत शिवसैनिक लीलाधर डाके यांचे पूत्र होत. पराग हे देखील शिवसेना आणि मातोश्रीप्रति विशेष निष्ठा बाळगून आहेत.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.