- मुंबईतील भायखळा स्टेशनमधील थरारक घटनेचा व्हिडीओ आला समोर
- Viral Video: महिला आत्महत्या करायला गेली, ट्रेन आली अन् क्षणार्धात…
मुंबई : – मुंबईत रेल्वेखाली उडी मारून अनेकजणांनी आत्महत्या केल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. त्याचबरोबर अनेकजणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचंही आपण ऐकलं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एक महिला लोकलखाली आत्महत्या करण्यासाठी गेली असल्याचं आपल्याला दिसत आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकातील असल्याचं समोर आलं आहे. सदर महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रूळावर उतरली होती. लोकल येत असताना ही महिला रेल्वे रूळावरून रेल्वेकडे चालत जात आहे. रेल्वे जवळ येत असताना अचानक रेल्वे पोलिस कर्मचारी त्या महिलेकडे पळत जात तिला रूळावरून बाजूला काढतो. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात असून सदर महिलेची समजूत काढून तिला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.
प्रेमात झाली फसवणूक म्हणून मुलीचे टोकाचे पाऊल
मुलीने उचलेले टोकाचे पाऊल यामागचे कारण म्हणजे मुलीची प्रेमात झालेली फसवणूक असल्याचं समोर येतं आहे.दरम्यान मुलीच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत ती धावत्या लोकल ट्रेनसमोर गेली आणि ती मुलगी ट्रेनकडे तोंड करून उभी होती.पण तिला वाचविण्यात यश आले आहे.
आरपीएफ जवानामुळे वाचले मुलीचे प्राण…
मुलगी धावत रेल्वे ट्रॅक वर जात असल्याचे उपस्थित लोकांनी बघताच मुलीला वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली दरम्यान एक आरपीएफ जवानांने थेट धाव घेतली आणि मुलीला रेल्वे रुळावरून दुसऱ्या बाजूला ढकललं. या व्हिडिओमध्ये एक आरपीएफ जवानही मुलीकडे धावताना दिसत आहे. या मुलीला वेळीच रेल्वे रुळावरून हटवले नसते तर हा अपघात होऊन मोठा अनर्थ झाला असता.
व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ…
मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला लोकल ट्रेन चालवणाऱ्या चालकाच्या हस्तक्षेपामुळे या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही आणि या तरुणीचा जीव वाचला. ही सर्व घटना रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.
हे वाचलंत का ?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.