धक्कादायक घटना : शिवाजीनगर पुलाखाली आढळले दीड महिन्याचे मृत अर्भक.

Spread the love

जळगाव :- शहरात नव्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाचा खाली मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात शाल मध्ये गुंडाळलेल्या एक सव्वा ते दीड महिन्याचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र मराठे यांना दिल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना याबाबत कळविण्यात असून ते घटनास्थळी दाखल झाले.

मृत अर्भक पुरुष जातीचे…

पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्डे व मातीच्या ढिगारांच्या मध्ये कचऱ्यासोबत हे अर्भक शाल व इतर कपड्यांमध्ये गुंडाळलेले आहे अर्बकाच्या दोन्ही हाता पायाला काळा दोरा बांधलेलं असून कृषी अवस्थेतील हे अर्भक आहे त्यासोबत औषधांच्या बाटल्या दुधाची बाटली व पाण्याची बाटली आढळून आली आहे.

शहर ठाण्याचे पोलिस दाखल…

घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने बघा यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. पोलीस शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी लगेचच घटनास्थळी आलेत. त्यांनी गर्दी पांगवून अर्भकाला नेण्यासाठी रुग्णवाहिककेला बोलावले. रुग्णवाहिकेतून हरभरा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

कोणी फेकले याची चर्चा…

तसे तर अनैतिक संबंधातून उत्पत्ती होणाऱ्या अर्बकातला फेकण्याच्या घटना वरचेवर घडत असताना हे सव्वा ते दीड महिन्याचे बालक कोणी असे उघड्यावर टाकून दिले यामागे काय कारण आहे याबाबत उपस्थित त्यामध्ये चर्चा होती.

शिवाजीनगर उड्डाणपूल पंधरा दिवसात पूर्वी नागरिकांनी स्वतःहून बाळाचा वापर करून वाहतुकीसाठी खुला करून घेतला आहे. या पुलाच्या खाली अर्बक मृतावस्थेत आढळल्याने या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सपाटीकरण करण्याची मागणी…

पुलाचे किरकोळ काम अद्याप बाकी आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला पुलाखाली अनेक ठिकाणी खोलगट व मातीचे ढिगारे असा परिसर तयार झालेला आहे. शेजारील रेल्वे लाईन जात असल्याने येथून चोऱ्या करून काही भामटे या ठिकाणी येऊन लपतात त्यामुळे मक्तेदाराने येथील खोदलेले खड्डे मातीने बुजून सपाटीकरण करून द्यावे अशी मागणी नगरसेवक राजू मराठे यांनी केली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार