एरंडोल तालुक्यात कोरोना चा पुन्हा उद्रेक .

Spread the love

आंँटींजन टेस्टमध्ये 14 आर टी पी सी आर मध्ये 2 असे 16 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी । एरंडोल :-एरंडोल शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून एक किंवा दोन किंवा एखाद्या दिवशी शून्य असे रुग्ण आढळून येत होते.

मात्र आज दिनांक 15 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 27 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 10 रुग्ण, विखरण येथील 2 रुग्ण खडके येथील 1, व आडगाव येथील एक असेच 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे. फरकांडे येथील दोन रुग्णांचा अहवाल rt-pcr मध्ये पॉझिटिव आढळून आला आहे असे एरंडोल तालुक्यातील एकूण 16 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील भोई गल्ली जेडीसीसी बँक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, मरीमाता मंदिर परिसरातील 19 वर्षीय युवक,जहांगीरपुरा परिसरातील 52 वर्षीय महिला, महात्मा फुले पुतळा परिसरातील 13 व 9 वर्षीय बालक, कागदी पुरा परिसरातील 62 वर्षीय महिला, बस स्टँड परिसरातील 45 वर्षीय पुरुष, रेणुका नगर परिसरातील 16 वर्षीय युवती, पांडव वाडा परिसरातील 54 वर्षीय पुरुष, माळीवाडा परिसरातील 32 वर्षीय पुरुष तसेच विखरण येथील 23 वर्षीय युवक 23 वर्षीय महिला खडके येथील 34 वर्षीय महिला आडगाव येथील 28 वर्षीय महिलातसेच आर टी पी सी आर मध्ये फरकांडे येथील 45 वर्षीय 2 महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे असे आज घेण्यात आलेल्या कोरोणा आंँटींजन टेस्टमध्ये 14 व आर टी पी सी आर 2 असे एकूण 16 रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत.

पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षण असल्यामुळे त्यांना आपापल्या घरीच होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. प्रशासनातर्फे कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा वारंवार सूचना देऊन ही तसेच नगरपालिकेतर्फे गावात रिक्षा फिरवुन मास्क लावा लसीकरण करून घ्या अश्या वारंवार सूचना देत आहेत परंतु या सूचनांकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहे असं दिसून येत आहे.

नागरिकांनी असेच दुर्लक्ष केले तर शहरासह तालुक्यात कोरणा चा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी केले आहे

टीम झुंजार