मेहरगांवातील बौध्दांवर सामुहिक अन्याय करणाऱयांवर कडक कारवाई करा,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची मागणी

Spread the love

अमळनेर शहर प्रतिनिधी:- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धुळे येथील मेहेरगाव मध्ये पोळाच्या दिवशी गावातील बौद्धांवर झालेल्या हल्यातील आरोपींना कडक शासन करण्याबाबत चे निवेदन प्रातधिकारी यांना देण्यात आले मेहरगांवातील बौध्दांवर झालेल्या सामुहिक अन्याय पोळाच्या दिवशी झालेल्या वादाला वेगळे वळण देवून बौद्ध समाजाला मेहरगांव येथील काही समाजकंटकांनी सामूहिक बहिष्कार टाकला होता.

तसेच काही बौद्ध तरुणांना तसेच महिलांना मारहाण करण्यात आली. त्या संदर्भी संबंधीतांबर सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रासिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे. असे असतांना देखील सदर गुन्हयातील-आरोपितांवर योग्य ती तात्काळ कार्यवाही करण्यात आली नाही.तरी चौकशी होवून त्यांच्यावर

होईल ते कडक शासन करून त्यांच्यावरती फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी.जेणे करून लोकशाहीला काळीमा फासण्याची कोणी हिम्मत करणार नाही.अश्या आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी(आंबेडकर गट) यांच्या वतीने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना देण्यात आले.

याप्रसंगी पितांबर वाघ,ऍड अभिजीत बिर्हाडे,समाज भूषण यशवंत बैसाणे,पंकज सोनवणे,अजय मोरे,छन्नू मोरे,भैय्या शिरसाट,संदीप नगराळे,गोपाल पवार,राहुल वाडेकर,विनोद बिर्हाडे,पप्पू केदार,उत्तम नगराळे,किरण बच्छाव ,प्रदीप मैलागिर,अजय गव्हाणे,मुन्ना सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार