गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरुन गेलेली विजेची तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळली. या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत बैलगाडीचा एक बैलही जागीच दगावला.
यावल :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिखली येथे शेतकरी नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी गावातून जात असतांना अचानक बैलगाडीवर विजेचा तार पडल्याने शेतकरी आणि बैलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळ हळ व्यक्त होतं आहे. यावल तालुक्यातील चिखली येथे शेतरस्त्यावरुन गेलेल्या विजेचा तार बैलगाडीवर कोसळून शेतकऱ्यासह एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. यशवंत कामा महाजन (वय ६५) रा. चिखली बुद्रूक असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेला बैल तर त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह अस दृश्य बघून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
चिखली बुद्रूक येथे यशवंत कामा महाजन हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेतमजुरी काम करुन ते त्यांचा उदर्निवाह करत होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे बैलगाडी घेवून शेतात जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर शेत रस्त्यावरुन गेलेला विजेचा तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळला. या घटनेत विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा मृत्यू झाला तर या घटनेत बैलगाडीचा एक बैलही जागीच ठार झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील भागवत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काल रात्री जोरदार पाऊस झाला होता. या जोारदार पावसामुळे महावितरण कंपनीचे आधीच सैल असलेले वीजेच तार तुटले असावेत व त्यातून ही मोठी घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली आहे.
दरम्यान, मयत यशवंत महाजन यांच्या पश्चात पत्नी अनुसयाबाई, मुलगा विकास असा परिवार आहे. महावितरणाने वेळीच लक्ष देवून जर हे वीजेचे तार ओढून घेऊन व्यवस्थित केले असते तर कदाचित आज ही घटना घडली नसती असं ग्रामस्थांमधून बोलले जात असून मयत यशवंत महाजन यांना शासकीय मदत मिळावी अशीही मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.