जळगाव : – बायकोने घटस्फोट दिल्याचा राग आल्याने चक्क संतप्त जावयाने सासऱ्याचे वाहन अन् घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात घडला आहे. शहरातील शनि मंदिरामागील कुंभार वाड्याला लागून अमीर जावेद खाटीक यांचे घर आहे. बुधवारी (ता. ३१) रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराबाहेर उभ्या दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी जावयाविरुद्ध खाटीक कुटुंबीयांनी तक्रार दिल्यावरून शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शनिपेठेत माजी महापौर भारती सोनवणे यांच्या घराशेजारील गल्लीत अमीर जावेद खाटीक (वय ४०) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते मटण-चिकन विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी (ता. ३१) अमीर खाटीक कुटुंबीयांसह बाहेरगावी मध्यप्रदेशात गेले होते. घरबंद असल्याची संधी साधत मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने त्यांच्या घराबाहेर उभी मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली. मोटारसायकल पेटवल्याने आगीचा भडका उडून घराचा काही भागही जळाला आहे. सकाळी खाटीक कुटुंबीय परतल्यावर त्यांना घर आणि दुचाकी जळाल्याचे आढळून आले.
त्यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेतली. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर एक दुचाकीस्वार दूरवर वाहन लावून पायी चालत आला. नंतर त्याने खिशातून पेट्रोलची बॉटल काढून वाहनावर ओतून पेटवून दिल्याचे आढळून आले आहे. वाहन पेटवणारा खाटीक कुटुंबीयांचा जवाई आदिल ऊर्फ शाहरुख सलिम खाटीक असल्याचे फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे.घटस्फोटानंतर गुन्हाही दाखलआदिल ऊर्फ शाहरुख सलीम खाटिक याच्याविरुद्ध अमीर खाटीक यांच्या मुलीने कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तीन महिन्यापूर्वीच या प्रकरणी घटस्फोट झाला असून भिती निर्माण करण्यासाठी आदिलने जाळपोळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.