पाचोरा :- ‘तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी का लावून दिले नाही’ असा सवाल करत तरुणाने मुलीच्या वडिलांवर पिस्तूल रोखल्याचा प्रकार रविवारी रात्री पाचोरा येथे घडला. तरुणाने वडिलांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी आरोपी रोहित सोनवणे याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे लग्न केल्याने राग
पाचोरा शहरातील गिरड रोडवरील हनुमान मंदिर भागात राहत असलेल्या अरुण यादव (वय ५२) यांच्या भावाच्या मुलीचे लग्न मलकापूर येथील तरुणाशी झाले आहे. त्यापुर्वी आरोपी रोहितसोबत या मुलीचे लग्न करण्याबाबत बोलणी सुरू होती. मात्र, वडिलांनी या मुलीचे लग्न आपल्यासोबत न लावता दुसऱ्या तरुणाशी लावून दिले, याचा राग रोहितच्या डोक्यात होता.
तरुणासह तिघांचे चाकुने वार
रागाच्या भरात रविवारी रात्री रोहित सोनवणे हा यादव यांच्या घरी आला. ‘तु मला तुझी मुलगी का दिली नाही’ असा जाब विचारत त्याने थेट यादव यांच्या कपाळावर पिस्तूल रोखले. यादव कुटुंबीयांनी आरडाओरडा केली. त्यानंतर जवळच राहत असलेले अरुण यादव यांचे मोठे जावई गोकुळ पाटील भांडण सोडवण्यासाठी आले. रोहितसह त्याच्यासोबत आलेल्या दोन साथीदारांनी गोकुळ पाटील यांच्यावर चाकुने वार करीत त्यांना जखमी केले.
घटनेनंतर आरोपी पसार
दरम्यान, या गोंधळामुळे परीसरातील लोक जमा होत असल्याचे निदर्शनास आल्याने रोहित सोनवणे व त्याचे दोन्ही साथीदार आपली दुचाकी घटनास्थळीच सोडून पसार झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौभे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, निवृत्त मोरे, योगेश पाटील हे पोहचण्याच्या आगोदर तिघे पसार झाले होते.
शोधासाठी पोलिस पथक रवाना
रोहित सोनवणे हा अरुण यादव यांच्या जावायाचा भाऊच असल्याने त्यांनी तक्रार देण्यावर रात्रभर विचार केला. अखेर दुसऱ्या दिवशी फिर्याद दिली. त्यानुसार रोहितसह तिघांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक मलकापूर येथे पाठविण्यात आले आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम