जळगाव,(प्रतिनिधी) : – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्व १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. दरम्यान मंगळवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशानुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत या निवडणुका होतील.तर २९ जानेवारी २०२३ ला मतदान आणि ३० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका
जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर,जळगाव एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भुसावळ, चोपडा या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
संपूर्ण निवडणुक कार्यक्रम वाचा
ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत संपुष्टात आली आहे. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात जिल्हा उपनिबंधक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून २७ सप्टेंबरला सदस्य सूची मागविली जाणार आहे. तर प्रारूप मतदार यादी तयार आहेत.करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवांकडे ३ ऑक्टोबरला दिली जाईल, त्यानंतर १४ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. २३ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. नामनिर्देशन २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान सादर केले जाईल. तर अर्जाची छाननी ३० डिसेंबर रोजी होईल. माघारीची मुदत २ ते १६ जानेवारी दरम्यान असणार आहे. तर उमेदवारांची अंतिम यादी १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. मतदान २९ जानेवारीला आणि मतमोजणी 30 जानेवारीला होणार आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.