धुळे : – सध्या महाराष्ट्रात अवैध तलवारी दुसऱ्या राज्यातुन आणण्याचं प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच धुळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तलवारी आढळून आल्या आहेत. याआधीही धुळ्यात तलवारींचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे काही अज्ञात तरुण तलवारींचा साठा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. ऐन गणेशोत्सवात ही कारवाई झाली आहे आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मालेगावच्या दिशेने तलवारींचा मोठा साठा नेला ( Police Seized Swords ) जात असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलीस अधिकाऱ्यांना ( Dhule Taluka Police ) मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारावर धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाई केली. या कारवाईत तलवारींसह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या हेतुने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, तरीही बेकायदेशीर प्रकार सुरूच आहेत. सराईत गुन्हेगारांनी आपली कारस्थाने सुरूच ठेवली आहेत. सणासुदीच्या दिवसात घातपात घडविण्याच्या इराद्याने तलवारींची तस्करी करणाऱ्या टोळक्याला धुळे तालुका पोलिसांनी पकडले आहे. धुळे तालुका पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून सहा हजार रूपये किंमतीच्या चार धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
चार जण अवैधरित्या तलवारी बाळगून एका दुचाकीवर कुसुंबाकडून मालेगावकडे जाणार असल्याची गुप्त माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. यानुसार शिंदे यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आरोपींना पकडले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विशाल नाना भील, विकास प्रकाश मालचे, व सुनिल नागो भील ( वय ३६ रा. सुभाषनगर) यांचा समावेश आहे. यातील चौथा आरोपी सुनिल भील हा कारवाई दरम्यान मोटारसायकलवरून पसार झाला होता. पोलिसांनी लागलीच शोध घेवून त्यालाही पकडले.
याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात १९९५ चे कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर संस्थेत आरोपींचा काही मोठा डाव होता की काय? हे तपासण्याचे काम आता धुळे तालुका पोलीस युद्ध पातळीवर करत आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४