वावडदा प्रतिनिधी (सुमित पाटील) दिनांक ६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. पंकज आशिया , प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. विकास पाटील , पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. शशिकांत सोनवणे ,गटशिक्षण अधिकारी मा. फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनातून जि .प. शाळा बिलवाडी ता. जि. जळगाव येथे बाला उपक्रमा अंतर्गत प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले.
या प्रेरणा सभेमध्ये तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय फिरोज पठाण साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय खलील शेख साहेब , म्हसावद शिरसोली केंद्राचे केंद्रप्रमुख तथा बिलवाडी शाळेचे मुख्याध्यापक कैलास पवार दादा , बोरनार शाळेचे मुख्याध्यापक बापू साळुंके , म्हसावद व शिरसोली केंद्रातील मुख्याध्यापक कैलास ठाकरे , पंकज भोसले , विनायक माळी , राजाराम सोनवणे , दीपक शिंपी , अजय पाटील , निलेश चौधरी , राजेंद्र पाटील तसेच बिलवाडी चे सरपंच , ग्राम पंचायत सदस्य , ग्रामसेवक , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.
या प्रेरणे सभेमध्ये कैलास पवार यांनी प्रास्ताविकात बाला उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले तर फिरोज पठाण साहेब व खलील शेख साहेब यांनी ग्रामस्थांना या उपक्रमातून गावातील विद्यार्थ्यांना होणारे फायदे विशद करून समस्त पालक व ग्रामस्थांचे उद्बोधन केले या प्रेरणा सभेचा तात्काळ परिणाम कार्यक्रमातच दिसून आला . बाला उपक्रमासाठी शाळेचा वाटा ९० हजाराचा शासन स्तरावरून निश्चित करण्यात आला होता . परंतु या प्रेरणा सभेच्या माध्यमातून ग्रामस्थांमधून उस्फुर्त योगदान देण्यात आले . शाळेचे मुख्याध्यापक यांनी रु. दहा हजार तर प्रत्येक शिक्षकाने रु. पाच हजार बिलवाडी गावाचे सरपंच यांनी रु. पाच हजार देणगी या उपक्रमासाठी तात्काळ दिली .
त्यामुळे बाला उपक्रमाचे उद्दिष्ट या प्रेरणा सभेमध्येच पूर्ण झाले . या सभेमध्येच लोकसहभागातून रुपये ९१ हजार ६५० रुपयांचा निधी जमा झाला . तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण साहेब यांनी ग्रामस्थांच्या या दातृत्वाचे कौतुक केले व सर्वांना धन्यवाद दिले . या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचा यथोचीत सन्मान शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख व सरपंचाच्या शुभहस्ते करण्यात आला . या प्रेरणा सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता जोशी मॅडम तर आभार गोसावी मॅडम मांडले प्रेरणा सभेच्या यशस्वीतीसाठी बिलवाडी शाळेच्या सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले……