देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरणारी घटना समोर आली आहे रेल्वेच्या खाली पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील पण रेल्वे अंगावरून गेल्यावरही जीव वाचण्याच्या घटना क्वचितच आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आख्खी रेल्वे अंगावरून गेली तरी नशीब बलवत्तर म्हणून एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडिओ असून प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकच्या मध्ये हा व्यक्ती पडला. रेल्वे आल्यानतंर तो व्यक्ती तसाच झोपून राहिला, त्यामुळे त्याला कसलीच दुखापत झाली नाही. पण थोडी जरी चुक झाली असती तर सदर व्यक्तीला जीव गमवावा लागला असता. पण काही व्यक्तींचे नशीब बलवत्तर म्हणतात ना… तसाच काहीसा प्रकार घडला आहे.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे यासंदर्भात माहिती मिळाली नाही. ट्रेन अंगावरून निघून गेल्यावर आपला जीव वाचला म्हणून हा व्यक्ती उपस्थित असलेल्या लोकांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. तर हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून खाली कसा पडला यासंदर्भातही माहिती अजून समोर आली नाही.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






