जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला आयशरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तसंच या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला आयशरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी मॅक्झिमो (क्रमांक एम.एच.१९ बी.यू. ४९७७) हे चोपड्याकडे जात असताना धानोरा गावाच्या पुढे देवगाव फाट्याजवळ आयशर ट्रक (एच. आर. ६३ यू ४७४७) ने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात शोभाबाई विनोद आढाळे (वय ३०, रा. पिंप्राळा), श्रीराम सुरसिंग (वय ४५), बन्सीलाल सुरसिंग (वय ३५) ,घनश्याम आढळकर (वय ३८, सर्व रा. धानोरा) तसंच नितीन सोनवणे (वय ३८), मनोज गवळी (वय ३५, रा. शनिपेठ) आदी जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांद्वारे जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






