पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; तलावात पाेहचण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे सर्व नद्या,तलाव पुणे शमतेने भरले आहे त्यामुळे शाळकरी मुलांना पोहण्याचा मोह झाला आणि तोच मोह त्यांच्या जिवावर वितला. तलावात पाेहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मित्रांपैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी जळगाव तालुक्यातील शिरसाेली येथील धारागिर शिवारात घडली. या मुलांचे मृतदेह दुपारी तीन वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात आणण्यात आलेत. कुटुंबियांंसह परिसरातील नागरीकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली हाेती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त हाेत आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरसाेली गावातील भाेलेनाथा नगरात राहणार असणारे येथील शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेले निलेश राजेंद्र मिस्त्री (वय 17),सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय 15 व जय जालिंदर साेनवणे हे तिघेे मत्र परिसरात असलेल्या धारागिर या तलावात पाेहण्यासाठी दुपारी दाेनअडीच वाजेच्या सुमारास गेले होते.

खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले

यंदा पाऊस अधिक झाल्याने तलावातील पाण्याच्या खाेलीचा त्यांना अंदाज अाला नाही. त्यामुळे त्यांना पाेहण्याचा अधिक सराव नसल्याने ते खाेलात जावुन गटांगळ्या खावू लागलेत. यात निलेश मिस्त्री व सूर्यवंशी शिवाजी पाटील हे पाण्याखाली गेलेले बराच वेळ झाले तरी वर अाले नाहीत. तर जय साेनवणे हा कसबसा तलावाच्या बाहेर येवून बचावला.

बचावलेल्या जयची आरडाओरड

जय बचावून बाहेर आल्यानंतर त्याने आराडाओरड करून मदतीसाठी बाेलावले. त्यानंतर गावातील पट्टीचे पाेहणाऱ्या तरुणांनी तलावात जावून बुडालेल्या दाेघांचा शाेध घेतला. अर्धापाऊण तासाच्या शाेध माेहिमेनंतर दाेघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अाले. यावेळी गावातील नागरिकांनी माेठ्या संख्येने तलावाकडे धाव घेऊन गर्दी केली हाेती.

रुग्णालयात आणले मृतदेह

घटनेची माहिती एमआयडीसी पाेलिस ठाण्याला कळविण्यात आले. यानंतर बीटचे पाेलिस कर्मचारी घटनास्थळी पाेहचलेत. त्यांनी दाेन्ही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. या ठिकाणी गावातील नागरिक शाळेचे शिक्षक आणि दोन्ही मृतांचे नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार