जळगाव ( Jalgaon ) :- सध्या देशात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीचे उत्सवाचे वातावरण(Ganesh Visarjan 2022) असतांनाच जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी रात्री मेहरुन परिसरात गालबोट लावणारी घटना रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील मेहरुन परिसरातील उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रात्रीच चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मेहरुन परिसरात महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकला. तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी रात्रीच महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली.
घटनास्थळी मूर्ती सोडून सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते पसार
घटनेनंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती आहे त्या परिस्थितीत घटनास्थळावर सोडून पळ काढला. यावेळी कारच्या काचाही फोडण्यात आल्या असून त्यामुळे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात मूर्ती विसर्जनासाठी हलवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या. नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोण्याच्या गोण्या गुलाल महापौरांच्या घरावर उधळला . यावेळी महाजनांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितलं. मात्र त्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले व समजूत घालणाऱ्या महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक केली, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
महापौरांचा पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचं म्हटलं आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. या घटने संदर्भात एम आय डी सी पोलिस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तसेच घटल्यानंतर घडल्यानंतर या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी पाहणी केली. मात्र त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवली नसल्याचा आरोपही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केला.
जळगाव शहराच्या प्रथम नागरिकांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? जळगावातील कायदा व सुव्यवस्था संपली असून पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी या घटनेवर बोलताना दिली आहे.
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसात ज्या पद्धतीने तक्रार दाखल होईल त्या तक्रारीनुसार सखोल चौकशी करण्यात येईल. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.