संतापजनक ; अवैधरीत्या जनावरांची वाहतूक : कंटेनरमधून घेऊन जाणाऱ्या 40 जनावरांचा गुदमरून मृत्यू

Spread the love

शीरपुर : – सध्या देशात अवैध रीत्या गौ मातेची कत्तल साठी वाहतूक केली जाते अश्यातच मध्य प्रदेशातील सेंधव्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या कंटेनरमधून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक केली जात होती. हा कंटेनर सांगवी पोलिसांनी अडवला. तपासणी केल्यावर त्यात ४१ जनावरे आढळली. त्यातील ४० जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली.

माहितीनुसार, सांगवी पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी भिकाजी पाटील, योगेश मोरे, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, सईद शेख यांनी सेंधव्याहून शिरपूरकडे जाणारा कंटेनर (आरजे १८ जीबी ३६३६) पळासनेर गावाजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी हा कंटेनर महामार्गावरील अन्नपूर्णा हॉटेलजवळ अडवला. कंटेनरविषयी चालक गोलू ऊर्फ गोविंद खुमानसिंग (३०, रा. वाॅर्ड नं.१ नरापुरा, ता. जि. रायसेन, मध्य प्रदेश) याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कंटेनरची तपासणी केल्यावर त्यात ४१ जनावरे आढळली. त्यातील ४० जनावरांचा मृत्यू झाला होता. गोलूवर गुन्हा दाखल केला.

मृत जनावरे पुरली :

कंटेनरमध्ये अत्यंत दाटीवाटीने जनावरे भरण्यात आली होती. त्यांचे पाय बांधण्यात आले होते. मृत जनावरे पोलिसांकडून पुरण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालक गोलू ऊर्फ गोविंद खुमानसिंग याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईत २५ लाखांचा कंटेनर जप्त करण्यात आला. तसेच ५ लाख ६६ हजार रुपयांची जनावरे आढळली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार