पल्स पोलिओला कोरोनाचा फटका;आता २७ फेब्रुवारीला ‘दो बुंद जिंदगी के’

Spread the love

पूर्णा प्रतिनिधी कलीम सय्यद


पूर्णा :- पल्स पोलिओ मोहीम येत्या २३ जानेवारी रोजी नियोजित करण्यात आले होते. मात्र देशभरात कोरोना व ओमीक्रोन संसर्गाचा वेग वाढल्याने पल्स पोलिओ मोहीम आता २३ जानेवारी ऐवजी २७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य विभागामार्फत २३ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानुसार आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओ चे नियोजन देखील करण्यात आले होते नुकतीच या संदर्भात (दि.१० जानेवारी रोजी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक होऊन पूर्वतयारी बाबतचा आढावा घेण्यात आला होता. मात्र जिल्ह्यासह देशभरात कोविड संसर्गाचा वेग झपाट्याने वाढला आहे. कोविडचा संसर्ग लहान मुलांना होऊ नये या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालया तर्फे पल्स पोलिओ मोहीम एक महिना पुढे ढकलत २७ फेब्रुवारी रोजी राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण अभियान २७ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन डॉ. राहुल गीते यांनी केले आहे

टीम झुंजार