जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.
वृषभ :-
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.
मिथुन :-
दिवस आपल्या मनासारखा जाईल. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.
कर्क :-
व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.
सिंह :-
आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.
कन्या :-
घरासाठी योग्य अशी खरेदी कराल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.
तूळ :-
कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.
वृश्चिक :-
लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.
धनू :-
बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.
मकर :-
सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अति अपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.
कुंभ :-
लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. कलेत मन रमेल. अधिकार्यांच्या सहकार्याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.
मीन :-
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






