“घाबरू नको, जीव वाचला हे महत्त्वाचं. गाडी आपण नवी घेऊ” अशी समजूतही शिंदेंनी काढली आहे., चालकाला रडू कोसळलं!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादवरुन परतत होते. काल संध्याकाळीच तिथे त्यांची सभा झाली. त्यानंतर ते मुंबईकडे येत असताना विलेपार्ले परिसरात एका गाडीने पेट घेतला होता. शेजारीच ज्याची गाडी आहे तो तरुण उभा होता. त्याला पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी आपला ताफा थांबवला आणि त्याची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांचे आश्वासक शब्द ऐकताच या तरुणाला रडूच कोसळलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटरवरुन हा व्हिडीओ शेअऱ केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका तरुणाची विचारपूस करताना दिसत आहे. शिंदेंनी तरुणाला नाव विचारलं, त्यानंतर “घाबरू नको, जीव वाचला हे महत्त्वाचं आहे. गाडी आपण नवी घेऊ”, असं म्हणत त्यांनी त्याची समजूतही काढली. हे ऐकताच या तरुणाला रडू कोसळल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर शिंदेंनी पोलिसांशी चर्चा केली, त्याच्यासोबत कोण आहे का वगैरे चौकशी केली. त्यानंतर पुन्हा त्या तरुणाला “गाडीजवळ जाऊ नकोस बाळा”, असं सांगितलं.
पहा व्हिडिओ :
ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडल्याचं म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले परिसरात एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरुन घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिलेत. हे आहेत आपले मुख्यमंत्री, असं ट्वीट शिंदे गटाच्या समर्थक नेत्या शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






