पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच एक गतिमंद तरुणी अत्याचारातून अडीच महिन्यांची गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतिमंद तरुणीवर गावातच राहणाऱ्या ज्योतीराम पांडुरंग पाटील वय २२ याने अत्याचार केल्या असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, गेल्या चार ते पाच महिन्यापासून मध्यरात्री पीडीतेची आई झोपलेली असताना पीडितेवर हा नराधम अत्याचार करायचा. दोन महिन्यांपूर्वी पिढीतेच्या नातेवाईकांनी ज्योतीराम पाटील याला दुष्कृत्य करताना रंगेहात पकडले होते.
प्रतिष्ठित नागरिकांनी त्याला याबाबत समजही दिली होती. त्यानंतर एके दिवशी पीडित तरुणी व तिची आई या दोघीही आजारी पडल्या. या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करताना पीडित तरुणी ही अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
यासंदर्भात पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचायत समोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याला पीडिते सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु त्याने प्रस्ताव नाकारल्यामुळे अखेर पीडित मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्योतिराम पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भरत काकडे हे करीत आहेत
हे वाचलंत का ?
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.