एरंडोल ।प्रतिनिधी
एरंडोल :- येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरात सुमारे 182 दात्यांनी रक्तदान केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे बाजार समितीचे माजी सभापती शालीकग्राम गायकवाड यांच्याहस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.विवेकानंद केंद्राच्या वतीने गेल्या वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद केंद्र व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रामानाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाडे यांनी येणाऱ्या कोरोनाच्या संकटात रक्ताची टंचाई निर्माण झाली तर या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांची गैरसोय दूर होऊन त्याना जीवदान मिळणार असल्याचे सांगितले.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या सुवर्ण महोत्सवी 50वर्षे झाल्याबद्दल प्रत्येक रक्तदात्यास विवेक शलाका डायरी ,प्रमाणपत्र व डॉ पी जी पिंगळे यांचे कडून पद्मालय येथील गणरायाच्या पाकीट फोटो सप्रेम भेट म्हणून देण्यात आला.
धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विशाल तिवारी,डॉ इब्राहीम बोहरी,यांनी सपत्निक उपनगराध्यक्ष कृनाल महाजन, यांचेसह अनेक युवकांनी व युवतींनी रक्तदान केले.शिबिरास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,योगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.जी.आर.महाजन,नरेश डागा,डॉ.पी जी पिगळे,,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर.डी.पाटील, डॉ.राहूल पाटील
ज्ञानेश्वर पाटील, शैलेश पाटील, दर्शन डूबे, स्वप्निल महाजन, श्रेयस बडगुजर,पी ओ जोशी,कुलदीप महाजन, गौरव महाजन, कल्पेश महाजन, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे मॅनेजर जितेंद्र शहा, पब्लिक टेक्निशियन ऑफिसर अर्जुन राठोड, डॉक्टर फिरके, डॉक्टर शुभम पाटील, टेक्निशियन सुनील पाटील, योगेश पाठक विजय कुलकर्णी उदय सपकाळे यांचेसह पदाधिका-यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून याबाबत समाजात जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया रक्तदान करणा-या युवकांनी व्यक्त केली. या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विवेकानंद केंद्राच्या सुवर्ण जयंती महोत्सव असल्यामुळे विक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी युवक व युवतींनी स्फुतीने आपला सहभाग नोंदवला होता संध्याकाळ झाली तरी सुद्धा रक्तदान करण्यासाठी युवक हे लायनीत उभे होते.
एरंडोल शहरात पहिल्यांदाच विक्रमी 182 रक्तदात्यांनी रक्तदान करून रेकॉर्डब्रेक केला आहे.