27 People Sitting Car News
लंडन :- गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक काहीही करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये २७ लोक पाच सीटर मिनी कूपर कारमध्ये (Car) बसताना दिसत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक अंग मुरडत कारमध्ये शिरताना दिसत आहेत. गाडीत जाण्यासाठी स्वयंसेवकांची रांग असते आणि मग एक एक करून २७ जण आत जातात.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) हा व्हिडिओ ६ सप्टेंबर रोजी ट्विट केला होता. खरंतर हा व्हिडिओ ८ वर्ष जुना आहे. यूकेमध्ये हा व्हिडिओ शूट केला गेला होता. रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. परिस्थिती अशी होती की सीटवर बसलेल्या लोकांच्या वरती लोक बसले होते. त्यामुळे गाडी (Car) पूर्णपणे भरली होती.
इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करीत होते. एका युजरने लिहिले, अपघात होईपर्यंत ही सर्व मजा आहे. नुकतेच अमेरिकेतील एका व्यक्तीने एका मोठ्या भोपळ्यात बसून ६१ किलोमीटरचे अंतर कापले होते. त्यांनी स्वतः भोपळाही पिकवला होता. हे सर्व केवळ वर्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी केले गेले.
भारतात ऑटोमध्ये २७ लोक बसले
जुना व्हिडिओ पाहून लोकांना खूप मजा येत होती. मात्र, भारतात अशा घटना रस्त्यांवर होताना दिसतात. जुलैमध्ये एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये २७ लोक एका ऑटोतून खाली उतरले होते. हे पाहून पोलिसही अचंबित झाले. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील बिंदकी कोतवाली येथील आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






